
दिनांक 31/10/2026 रोजी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पोलीस स्टेशन रिसोडच्या वतीने एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर दौडीची सुरुवात सकाळी 07:00 वाजता पोलीस स्टेशन रिसोड येथून करण्यात आली. त्यानंतर रिसोड शहरातील लोणी फाटा, बस स्टँड, वाशिम नाका व सिव्हिल लाईन या मुख्य मार्गाने वॉक व दौड घेऊन सकाळी 08:00 वाजता पोलीस स्टेशन रिसोड येथे दौडीची सांगता करण्यात आली. सदर कार्यक्रमात पोलीस स्टेशन रिसोड येथील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार, विद्यार्थी, पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण तसेच नागरिक असे एकूण 125 ते 150 जण सहभागी झाले होते. या एकता दौडीच्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रीय एकता, बंधुभाव व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. तसेच कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर व नवीन कायद्यांबाबत मार्गदर्शन करून जनजागृती करण्यात आली.