राजीव गांधी विद्यालय, ग्राम शेलगाव बोंदाडे येथे गणेशोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा, महिला सुरक्षा, सायबर सुरक्षा, मोबाईल वापर, डायल 112 व स्पर्धा परीक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम
आज दिनांक 22/09/2026 रोजी पोलीस स्टेशन शिरपूर जैन, ता. मालेगाव, जि. वाशिम मार्फत ग्राम शेलगाव बोंदाडे येथील राजीव गांधी विद्यालयात इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेशोत्सवानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आली. यावेळी नशामुक्ती, सोशल मीडियाचा व मोबाईलचा सुरक्षित वापर, स्वतःची सुरक्षा, डायल 112, सायबर फ्रॉड, सायबर सुरक्षा व स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गणेशोत्सवानुषंगाने आवश्यक सूचना देण्यात आल्या. निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
पोलीस ठाणे, शाखा किंवा कार्यालय
शिरपूर
वेळ
13:00
ठिकाण
राजीव गांधी विद्यालय, ग्राम शेलगाव बोंदाडे, ता. मालेगाव, जि. वाशिम
वरिष्ठ अधिकारी
Pi योगिता भारद्वाज मॅडम, PC नागेश/221, PC विजय/194, PC हरिहर/348, मपोका सोनाबाई/300, आरती/1092, नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार