
पोलीस स्टेशन रिसोडच्या वतीने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या एकता परेडचे प्रक्षेपण नगरपरिषद हॉल, रिसोड येथे प्रोजेक्टरच्या माध्यमातून दाखविण्यात आले. सदर कार्यक्रमास पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार, एनसीसी विद्यार्थी, पोलीस मित्र तसेच इतर विद्यार्थी असे एकूण 30 जण उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांना राष्ट्रीय एकता, अखंडता व बंधुभावाचा संदेश देण्यात आला.