
दिनांक 31/10/2026 रोजी सकाळी 08:00 वाजता एकता दिनानिमित्त पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीणच्या वतीने ग्राम काटा येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात 'रन फॉर युनिटी' (एकता दौड) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात 02 पोलीस अधिकारी, 30 पोलीस अंमलदार, 12 शिक्षक व 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकता, बंधुभाव व सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना महिला सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, वाहतूक नियम व डायल 112 या आपत्कालीन पोलीस हेल्पलाइनबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.